#खारेशेंगदाणे😋
#SaltedPeanuts
लहानपणा पासून ते गाड्यावरचे खारे शेंगदाणे पाहिलं तर कंट्रोल च होत नाही..किती ही खाल्ले तरी कमीच पडतात राव.. स्वयंपाकाची आवड असल्यामुळे try केल्याशिवाय राहवत नाही..मग केला प्रयत्न आणि म्हणतात ना प्रयत्नाशी परमेश्वर.. मग जमलंच कि मन लावून केल ना☺..
सगळ्यात महत्वाचं झटपट होतात आणि सामान ही लागत नाही..एकदम मार्केट सारखे लागतात.
साहित्य:-
पाव किलो शेंगदाणे
3 छोटे चमचे पाणी
अर्धा कप +एक चमचा मीठ
कृती:-
1, एका भांड्यात 3 चमचे नॉर्मल पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ घाला.
2. आता यात पाव किलो शेंगदाणे घालून एकदा मिक्स करून घ्या आणि 20 ते 25 मिनटे बाजूला ठेवा
3 मीठामुळं या शेंगदाण्यांना पाणी सुटत.हे आता एका चाळणीत घालून सगळं पाणी काढून घ्या
4 कढईत अर्धा कप मीठ घालून मोठ्या आचेवर 3 ते 4 मिनटे गरम करून घ्या.आता गॅस मंद आचेवर ठेवून त्यात चाळणीवरचे पाणी गाळून घेतलेले शेंगदाणे घाला आणि सारखे फिरवत रहा.
5 साधारण 6 ते 7 मिनटात शेंगदाणे तयार होतील आणि टरफळ्यांचा आवाज येण्यास सुरवात होईल.मग गॅस बंद करून एका चाळणीत हे काढून घ्यावे.असे केल्याने शेंगदाण्यातील सर्व मीठ निघून जाते.
6 आता शेंगदाणे थोडे गार करून हवाबंद डब्यात ठेवावेत.
झाले झटपट खारे शेंगदाणे तयार😋😍..नक्की करून बघा तुह्माला जरूर आवडतील आणि केल्यावर अभिप्राय कळवा.
टीप:-
उरलेले मीठ टाकू नये.ते केक बेकिंग साठी किंवा खारे शेंगदाणे परत करण्यासाठी वापरता येते.
या पोस्ट ला जास्तीत जास्त शेअर करा.
आणि फॉलो करत रहा Indian Food Recipes 2019
0 Comments