आइस्क्रीमच्या काही रेसिपी | Some Recipes of Ice-cream

आइस्क्रीमच्या काही रेसिपी | Some Recipes of Ice-cream

Indian Food Recipes 2019


नमस्कार मंडळी.
हिवाळा गेला म्हटलं, आता येतोये उन्हाळा.
तर चला मग या गरमागरम उन्हाळ्यात बनवूया थंडीगार आइसक्रीम.

साहित्य :- 
अर्धा लिटर दुध , कॉर्नफ़्लोवर , CMC पावडर , GMS पावडर, साखर ......
कृती :- 
येका पातीलीत अर्धा लिटर दुध घ्या. त्या मध्ये ८ टेबल स्पून साखर घाला. त्यात २ टेबल स्पून सपाट GMS पावडर घाला. २ टेबल स्पून कोर्नफ्लोवर घाला. नंतर पाव टी स्पून अर्धा CMC पावडर घालून हलवा . नंतर पातेलं ग्यासवर मध्यम आचेवर मिश्रण ठेऊन सारखे ढवळत राहा. एक उकळी आल्यावर ग्यास बंद करा मिश्रण पूर्ण गार होई पर्यंत ढवळत रहा. पूर्ण गार झाल्यावर एका प्ल्यास्टिक च्या डब्यात घालून सेट होण्या साठी फ्रीझर मध्ये ठेवा . बेस तयार होण्यासाठी १२ तास लागतात. हा बेस १ महिना राहतो. त्यात यीसेन्स , विप क्रीम व कलर घालून आइसक्रीम करा.


Indian food recipes 2019


Vanila Ice-cream:-
आइसक्रीम बेस , १०० ग्रॅम विप क्रीम व ८ ते १० थेंब Vanila यीसेन्स घालून १० ते १५ मिनिट बीट करणे व डब्यात घालून फ्रीझर मध्ये ठेवणे. 

Indian food recipes 2019


Strawbery Ice-cream:-
आइसक्रीम बेस , १०० ग्रॅम विप क्रीम व ८ ते १० थेंब Strawbery यीसेन्स घालने व ४ ते ५ थेंब पिंक कलर घालणे त्यात Strawbery क्रश घालून १० ते १५ मिनिट बीट करणे व डब्यात घालून फ्रीझर मध्ये ठेवणे. 


Indian food recipes 2019


Chocolate Ice-cream:- 
आइसक्रीम बेस , १०० ग्रॅम विप क्रीम , १ टेबल स्पून कोको पावडर , ८ ते १० थेंब चॉकलेट यीसेन्स घालणे व ४ ते ५ थेंब चॉकलेट कलर घालणे १० ते १५ मिनिट बीट करणे व डब्यात घालून फ्रीझर मध्ये ठेवणे त्यावर चॉकलेट चे तुकडे घालणे . 

Indian food recipes 2019


ButterScotch Ice-cream:- 
आइसक्रीम बेस , १०० ग्रॅम विप क्रीम व ८ ते १० थेंब ButterScotch यीसेन्स घालने व ४ ते ५ थेंब लेमन कलर घालणे त्यात काजूचे तुकडे घालणे व १० ते १५ मिनिट बीट करणे व डब्यात घालून फ्रीझर मध्ये ठेवणे.

Indian food recipes 2019


Mango Ice-Cream:- 
आइसक्रीम बेस , १०० ग्रॅम विप क्रीम व ८ ते १० थेंब Mango यीसेन्स घालने व त्यात Mango क्रश घालून १० ते १५ मिनिट बीट करणे व डब्यात घालून फ्रीझर मध्ये ठेवणे.

Indian food recipes 2019


 Gulkand Ice-Cream:-
आइसक्रीम बेस , १०० ग्रॅम विप क्रीम व ८ ते १० थेंब रोज सायरप घालने व ४ ते ५ थेंब पिंक कलर घालणे १० ते १५ मिनिट बीट करणे व डब्यात घालून फ्रीझर मध्ये ठेवणे.

Indian food recipes 2019


Pista Ice-cream:- 
बेस , १०० ग्रॅम विप क्रीम व ८ ते १० थेंब पिस्ता यीसेन्स घालने व ४ ते ५ थेंब ग्रीन कलर घालणे १० ते १५ मिनिट बीट करणे व डब्यात घालून फ्रीझर मध्ये ठेवणे ए त्यावर पिस्त्याचे तुकडे घालणे. 

Indian food recipes 2019


Keshar Pista Ice-Cream:-आइसक्रीम बेस , १०० ग्रॅम विप क्रीम व ४ ते ५ थेंब लेमन कलर घालणे त्यात ४ ते ५ थेंब केशर यीसेन्स व केशर दुधात कालवून घालणे १० ते १५ मिनिट बीट करणे व डब्यात घालून फ्रीझर मध्ये ठेवणे त्यावर पिस्ता चे काप टाकणे.

Post a Comment

0 Comments