पनीरच्या काही रेसिपी | Some Recipes of Paneer Part 1

पनीरच्या काही रेसिपी | Some Recipes of Paneer 

Indian Food Recipes 2019

  • पनीर लॉलीपॉप


साहित्य:
१ कप पनीर, किसलेले
२ मध्यम बटाटे, उकडलेले
दिड टीस्पून आले, किसलेले
१ टीस्पून लसूणपेस्ट
२ टीस्पून लाइट सोय सॉस
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
१ टेस्पून कॉर्न स्टार्च
१/२ टीस्पून पांढरी मिरपूड
२ ते ३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१/४ कप कांदा, बारीक चिरून
३ टेस्पून मैदा,
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल
८ ते १० लाकडी स्टिकस किंवा skewer

कृती:
१) बटाटे सोलून व्यवस्थित कुस्करून घ्यावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.
२) मैदा सोडून सर्व साहित्य एकत्र करून छान मळून घ्यावे. मध्यम आकाराचे ८ ते ९ गोळे बनवावे.
३) १ गोळा घेऊन तो नीट दाबून घट्ट करावा व त्यात लाकडी स्टिक एका बाजूने घालावी. मुठीने नीट आवळून नीट बांधून घ्यावा, जेणेकरून तेलात सोडल्यावर गोळा सुटणार नाही. अशाप्रकारे सर्व लॉलीपॉप बनवून घ्यावे.
४) तयार लॉलीपॉप कोरड्या मैद्यामध्ये घोळवून घ्यावे. किंचित हलवून जास्तीचा मैदा काढून टाकावा.
५) पुरेसे तेल तापवून आच मध्यम करावी आणि सर्व लॉलीपॉप तळून घ्यावे. तळताना मध्येमध्ये लॉलीपॉप झाऱ्याने फिरवावेत, म्हणजे सगळीकडून नीट तळले जातील.
गरमागरम लॉलीपॉप शेझवान सॉस किंवा टोमाटो केचप बरोबर सर्व्ह करावेत.


  •  क्रिस्पी शेजवान पनीर फिंगर्स


साहित्य:
२०० ग्रॅम बारीक केलेले पनीर, 
१०० ग्रॅम कॉर्न फ्लॉवर, 
१०० ग्रॅम मैदा, 
प्रत्येकी दिड चमचा लसूण पेस्ट आणि आले पेस्ट, ८-९ कडीपत्त्याची पाने, मीठ, 
४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 
२ बारीक चिरलेले कांदे, 
प्रत्येकी दिड चमचा सोया सॉस आणि व्हिनेगर, 
अर्धा कप तेल, १ चिमूट मिरपूड, 
१ धुऊन कोरडी केलेली बारीक चिरलेली लाल मिरची.

कृती:
१. एका भांड्यात मैदा आणि कॉर्न फ्लॉवर एकत्र करा.
२. त्यात आवश्यकतेनुसार मीठ घालून एकत्र मिसळा.
३. वरून व्हिनेगर आणि सोया सॉस घाला.
४. दुसऱ्या एका भांड्यात मंद आचेवर तेल गरम करून घ्या.
५. तेल चांगले गरम झाले की, त्यात आले-लसूण पेस्ट, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि लाल मिरची, मिरपूड, कांदा, कडीपत्ता घालून चांगले परतून घ्या.
६. मिनिटाभरात गॅस बंद करून परतलेली सामग्री मैदा-कॉर्न फ्लॉवरच्या बॅटरमध्ये घालून एकजीव करून घ्या.
७. कढईत तेल गरम करायला ठेवा.
८. आणि दुसऱ्या बाजूला पनीरचे काठीसारखे उभट रोल करून घ्या.
९. बॅटरमध्ये हे रोल घोळवून गरम तेलात सोडा.
१०. रोल गोल्डन ब्राऊन रंगात तळून घ्या.
११. टिश्शू पेपर ठेवलेल्या ताटात हे रोल काढून घ्या म्हणजे अतिरिक्त तेल शोषले जाईल.
१२. गरमगरम शेजवान पनीर फिंगर्स पुदिना चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.


  •  पनीर कबाब


साहित्य:
१२५ ग्रॅम पनीर क्युब्स, 
अर्धा कप दही, 
प्रत्येकी अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट, 
अर्धा चमचा चाट मसाला पावडर, 
पाऊण चमचा गरम मसाला पावडर, 
दिड चमचा लाल तिखट पावडर, 
अर्धा चमचा हिरवी मिरची सॉस, 
प्रत्येकी पाव चमचा जिरेपूड आणि धनेपूड, 
मीठ

कृती:
१. दही, आले-लसूण पेस्ट, चाट मसाला, लाल तिखट, गरम मसाला, हिरवी मिरची सॉस, जिरेपूड, धनेपूड आणि मीठ इत्यादी एका भांड्यात एकत्र करा.
२. पनीर क्युब्स या मिश्रणात चांगले घोळवून घ्या.
३. हे भांडे झाकणबंद करून साधारण २-४ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.
४. मॅरिनेट झालेले पनीर क्युब्स फ्रिजमधून काढून त्यातील पाणी गाळून घ्या.
५. मध्यम आचेवर ग्रील पॅन गरम करायला ठेवा.
६. पॅन चांगले गरम झाले की पनीर क्युब्स ३-४ मिनिटांसाठी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेकून घ्या.
७. गरमगरम पनीर कबाब पुदिन्याच्या चटणीसोबत लगेच सर्व्ह करा.


  •  पनीर कोल्हापुरी


साहित्य
पनीर : २५० ग्रॅम
टोमॅटो : ४ (२५० ग्रॅम)
हिरवी मिरची : २
आले : १ इंच तुकडा
काजू : १/४ कप
सुके खोबरे : १/३ कप (किसून)
तेल : २-३ टेबल स्पून
कोथिंबीर : २-३ टेबल स्पून
तीळ : २ छोटे चमचे
जिरं : १.५ छोटा चमचा
बडिशोप : १ छोटा चमचा
अख्खा गरम मसाला : १ इंच दालचीनी, १ मोठी वेलची, २ छोट्या वेळच्या, ४ लवंग, ८-१० काळी मिरी
अख्खी लाल मिरची : २
मीठ : १ छोटा चमचा किंवा चवीनुसार
लाल तिखट : १/२ छोटा चमचा
हळद : १/४ छोटा चमचा
हिंग : १ चिमुट
धने पावडर : १ छोटा चमचा
कृती
टोमॅटो , हिरवी मिरची, आले आणि काजू मिक्सर मध्ये घालून पेस्ट करून घ्या.
पनीरचे १-१ इंचाचे चौकोनी तुकडे करून घ्या.
कोल्हापुरी मसाला बनवण्यासाठी कढई गरम करून घ्या. तीळ, १ छोटा चमचा जिरं, बडिशोप, दालचीनी, लवण, काळी मिरी, छोटी वेलची आणि मोठी वेलची सोलून घाला आणि मसाले ढवळून हलके भाजून घ्या. आता त्यात किसलेले खोबरे घाला आणि मसाला ढवळून, भाजून घ्या.
भाजलेला मसाला प्लेट मध्ये काढून घ्या आणि थंड होऊ द्या.
मसाला मिक्सर मधुम भरभरीत वाटून घ्या.
कढई गरम करून घ्या. त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर जिरं घाला.
आता हिंग घाला, हळद, धने पावडर घाला आणि हलकेच परतवून घ्या.
आता त्यात अख्खी लाल मिरची, टोमटो, हिरवी मिरची, आले आणि काजू पेस्ट घाला.
चमच्याने ढवळून मसल्याला तेल सुटे पर्यन्त मसाले परतवा. मधूनमधून गॅस मंद व मध्यम आचेवर करा.
मसाला भाजून झाल्यावर त्यात लाल तिखट घाला आणि तयार कोल्हापुरी मसाला घाला आणि ढवळून घ्या.
मसल्याला तेल सुटायला लागले की अर्धा कप पाणी घाला आणि शिजू द्या.
ग्रेवी उकळू लागली की मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घाला. ढवळून घ्या.
पनीरचे तुकडे घाला आणि २ – ३ मिनिट मंद आचेवर झाकण ठेऊन भाजी शिजू द्यावी.
पनीर कोल्हापुरी तयार आहे. त्यावर थोडी कोथिंबीर टाका.


Post a Comment

0 Comments